श्रीदत्ताची आरती व अष्टक(विसरू कसा मी गुरू पादुकाला )- Shri datta Aarti and Ashtak - Visaru kasa mi guru padukala| The Spiritual Indians
श्रीदत्ताची आरती , श्लोक और अष्टक (विसरू कसा मी गुरू पादुकाला ) श्रीदत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रैमुर्ति दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोलवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ ।। श्लोक ।। गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु। गुरुर्देवो महेश्वराः।। गुरुः साक्षात्परब्रम्हः। तस्मै श्रीगुरु वे नमः।। सदा सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा।। उपेक्षू नको ग...