दत्त प्रार्थना - दत्तात्रय गुरु तुम्हीच ना?

दत्त प्रार्थना - दत्तात्रय गुरु तुम्हीच ना? जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना? । अनन्य भावेशंरणांगत मी, भवभय वारण तुम्हीच ना?।। धृ।। कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना?। स्वामि जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना? । नवनारायण सनाथ करूनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना? । मच्छिंद्रादी जति प्रवृत्त केले, जन उद्धार तुम्हीच ना? । दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना? । नाथ सनदिचे चोपदार तरि, श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना? । युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना? । बालन्मत्त पिशाच्य वृत्ती, धारण करता तुम्हीच ना? ।। स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना? । करुनी भिक्षा करविरी भोजन, पांचाळेश्वरि तुम्हीच ना? । तुळजापुरि कर शुद्धि तांबुल, निद्रा माहुरि तुम्हीच ना? । करुनि समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना? । विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरि गुरु तुम्हीच ना? । श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती, करंजनगरि तुम्हीच ना? । जन्मताच ओंकार जपोनी, मौन धरियेले तुम्हीच ना? । मौजी बंधन...